मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महिला मेळावा; महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ३ मार्चला इचलकरंजी येथे आयोजन

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महिला मेळावा; महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 
३ मार्चला इचलकरंजी येथे आयोजन

कोल्हापूर : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवार, दि. ३ मार्च रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या. खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अति.जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या. इचलकरंजी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून, हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in