आंब्याच्या झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू

वेंगुर्ला कुबलवाडा भराडी मंदिर शेजारी आंब्यांच्या झाडावर औषध फवारणी करताना झाडाची फांदी तुटून कामगार खाली पडून मयत
आंब्याच्या झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

वेंगुर्ला : वेंगुर्ला कुबलवाडा भराडी मंदिर शेजारी आंब्यांच्या झाडावर औषध फवारणी करताना झाडाची फांदी तुटून कामगार खाली पडून मयत झाला आहे. शेखर महादेव नाईक (वय ४९ राहणार वेंगुर्ला परबवाडा कणकेवाडी) असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना शनिवार, २ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

कुबलवाडा येथे प्रविण कुबल यांच्या आंबा बागेत नाईक काम करीत होता. कुबल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आंब्याच्या बागेत इतर कामगारांसोबत शेखर नाईक हा मागील सुमारे ८ ते १० वर्षांपासून आमच्याकडे कामास आहे. शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून निलेश कोनार व शेखर नाईक बागेत आंब्यांच्या झाडांवर औषध फवारणीचे काम करीत होते. दुपारी बागेतील आंब्याच्या झाडावर दोरी बांधून चढत असताना आंब्याच्या झाडाची फांदी तुटल्याने तो झाडावरुन उताण्या स्थितीत जमीनीवर पडून बेशुद्ध पडला. यापकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in