अजित पवारांसोबत गेलेले वाईचे आमदार मकरंद पाटील शरद पवारांच्या वाहनात

रात्रीत फिरली जादूची कांडी?
अजित पवारांसोबत गेलेले वाईचे आमदार मकरंद पाटील शरद पवारांच्या वाहनात
Published on

कराड :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी दिवसभर सातारा व कराडच्या दौऱ्यावर असताना त्यांचे जिल्ह्याच्या प्रवेशद्वार नीरा नदीच्या तीरावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे सोमवारी सकाळी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार, आ. रोहित पवार, प्रतिभाताई पवार यांच्यासमवेत आ. मकरंद पाटील हेही असल्याचे पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

अजित पवार यांच्या राजकीय बंडावेळी आमदार मकरंद पाटील यांचे नाव बंडखोरांच्या यादीत असल्याचे सांगण्यात आल्याने एका रात्रीत काय जादूची कांडी फिरली व आमदार पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आ. पाटील यांना अजित पवारांसोबत पाहून वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली होती, मात्र आमदार पाटील यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पाहून हे कार्यकर्ते आता नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

logo
marathi.freepressjournal.in