राणा दाम्पत्याच्या आरोपानंतर यशोमती ठाकूर आक्रमक ; 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार

राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
राणा दाम्पत्याच्या आरोपानंतर यशोमती ठाकूर आक्रमक ; 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार

माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा दाणा दाम्पत्यांनी केला आहे. यानंतर यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या असून त्या या आरोपावरुन राणा दाम्पत्यावर १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्यांकडून अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर यशोमती ठाकूर या चांगल्याचं आक्रमक झाल्या आहेत. नवरा बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहे. निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? ईडी काय करत आहे? देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात जायला वेळ आहे. अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

नवनीत राणा यांचं यशोमती ठाकूर यांना आव्हान

हर्मन्स कंपी उद्धव ठाकरेजींनी अमरावतीमध्ये आणलेली कंपनी आहे. तुम्ही हर्मन्स कंपनीचे आमि रेमन्स कंपनीचे कागदपत्रे घेऊन या. आम्ही फढणवीसांच्या काळातील कागदपत्रे घेऊन येतो. यावरून कंपनी नेमकी कोणत्या सरकारच्या काळात मतदारसंघात आणल्या गेल्या आहेत. जर आम्ही बोलतोय ते खरं झालं तर आमच्याऐवजी तुम्हालाच राजकारण सोडावं लागेल,असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in