Yashomati Thakur: यशोमती ठाकूर भाजपवर भडकल्या ; म्हणाल्या, "भाजपचा आणि नथुरामचा डीएनए..."

Yashomati Thakur: यशोमती ठाकूर भाजपवर भडकल्या ; म्हणाल्या, "भाजपचा आणि नथुरामचा डीएनए..."

भाजपने राहुल गांधींचा रावणाच्या रुपातला एक फोटो सोशल मीडियावर टाकल्यावर काँग्रेस आक्रमकपणे भाजपवर टीका करताना दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. या फोटोवर देशभरात भाजप काँग्रेस त्याच टीका-टीप्पणी आणि आरोप पत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राहुल यांचा फोटो अशा प्रकारे टाकल्याने काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.

भाजपवर टीका करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजपचा डीएनए आणि नथुराम गोडसेचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसेने पण गांधींना रावणाचं रुप दिलं होतं. आणि स्वत: महात्मा गांधींना मारायचा प्रयत्न केला होता. अशी टीका त्यांनी केली. तसंच संघ आणि भाजपा सतत तेच करत असतात, असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, गांधी त्या युगातले असो या युगातले असो गांधी गांधी आहेत. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतात. जी काही विकृती आहेस, ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे. यासाठी येणाऱ्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे, असा आमचा हट्टाहास असल्याचं देखील ठाकूर म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in