Jalgoan : वर्षभरापूर्वी बांधलेला पाळधी-तरसोद बायपास पूल खचला; खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

जळगाव शहरालगत वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेला पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग निकृष्ट कामामुळे दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता.
Jalgoan : वर्षभरापूर्वी बांधलेला पाळधी-तरसोद बायपास पूल खचला; खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी
Jalgoan : वर्षभरापूर्वी बांधलेला पाळधी-तरसोद बायपास पूल खचला; खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी(Photo-X/@girishdmahajan)
Published on

जळगाव : जळगाव शहरालगत वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेला पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग निकृष्ट कामामुळे दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. या पुलाची राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्राथमिक निरीक्षणात रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील या प्रकल्पाबाबत विविध तक्रारी आल्या होत्या.त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निपक्ष ,सखोल व तात्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गिरीश महाजन यंनी संबंधित यंत्रणांना दिले

पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

नागरिकांची काळजी घ्या!

नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, विकासाची कामे ही दर्जेदार, सुरक्षित आणि पारदर्शक असली पाहिजेत हीच आमची ठाम भूमिका असल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही पुलाच्या स्ट्रक्च्रल ऑउीटची मागणी करत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

गैरसोय टाळा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुलाच्या परिसरातील परिस्थिती, वाहतुकीवरील परिणाम तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करून गैरसोय होणार नाही, यासाठी उपाय केल्याचेही सांगितले.

युद्धपातळीवर दुरुस्ती करा

पाहणी दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठविण्यात यावे, नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in