प्रेमविवाहावरून येवल्यात लग्नमंडपात मोठा राडा; नवरदेवाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न? दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी

शहरातील एका लॉन्समध्ये सुमारे १०० ते २०० नातेवाइकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता.
प्रेमविवाहावरून येवल्यात लग्नमंडपात मोठा राडा; नवरदेवाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न? दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी
प्रेमविवाहावरून येवल्यात लग्नमंडपात मोठा राडा; नवरदेवाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न? दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी
Published on: 

येवला : प्रेमविवाहाचा राग मनात धरून नवरीच्या नातेवाइकांनी नवरदेव आणि त्याच्या नातेवाइकांच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप येवला शहरात करण्यात आला आहे. पारंपरिक विवाह सोहळ्यादरम्यान दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवल्यातील ऋषभ दीपक भगुंडे याने निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील तरुणीसोबत सप्टेंबरमध्ये प्रेमविवाह केला होता. सुमारे दोन महिन्यांनंतर नवरदेवाच्या नातेवाइकांनी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. शहरातील एका लॉन्समध्ये सुमारे १०० ते २०० नातेवाइकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता.

लग्नमंडपात विवाहविधी सुरू होते, मात्र याचवेळी नवरीच्या नातेवाइकांनी डिझेलचे कॅन आणून नवरदेव आणि त्याच्या नातेवाइकांच्या अंगावर डिझेल ओतल्याचा तसेच त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावरून दोन्ही गटांत हाणामारी झाली आणि जोरदार राडा झाला. लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी काही जणांनी घटनेचा व्हिडिओही बनवल्याचे समजते. यात ७ ते ८ जण जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी जवळपास १४ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

logo
marathi.freepressjournal.in