
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात झाला. या अपघातात आमदार योगेश कदम यांचा चालक आणि तीन पोलीस जखमी झाले आहेत. या अपघातात आमदार कदम बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर योगेश कदम यांनी अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली.
योगेश कदम म्हणाले, “मुंबईला जाताना माझा अपघात झाला. हा अपघात रात्री 16 च्या सुमारास घडला. पण, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने मी आणि माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरूप बचावलो.