सिगारेट पिऊन चालली होती थट्टा मस्करी, टवाळखोर तरुणांनी मित्रालाच केली बेदम मारहाण

रस्त्यात सिगारेट पिऊन टिंगल टवाळी करणाऱ्या दोन जणांनी त्यांच्याच मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना शहाड फाटक परिसरात घडली आहे.
सिगारेट पिऊन चालली होती थट्टा मस्करी,  टवाळखोर तरुणांनी मित्रालाच केली बेदम मारहाण

विशेष प्रतिनिधी

उल्हासनगर : रस्त्यात सिगारेट पिऊन टिंगल टवाळी करणाऱ्या दोन जणांनी त्यांच्याच मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना शहाड फाटक परिसरात घडली आहे. आरोपी हे भर रस्त्यात सिगारेट पिऊन थट्टा मस्करी करत होते यावेळेस त्यांच्या मित्राने असे करू नका असे बोलले असता आरोपींनी त्याला मारहाण केली.  या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.    

क्रिकेटच्या बॅटने केली मारहाण-

उल्हासनगर 1 शहाड फाटक परिसरात रात्री 10 वाजताच्या सुमारास एका पान टपरी जवळ फिर्यादी बॉबी रोहिरा (वय 21) याचे मित्र साहिल दयाल कुकरेजा (वय 20) आणि विवान हे दोघेजण सिगारेट पिऊन एकमेकांची थट्टा मस्करी करत होते यावेळी बॉबीने त्यांना सांगितले की थट्टा मस्करी करू नका रस्त्याने महिला, मुली व मुले येत असतात, यावर संतप्त झालेल्या साहिल आणि विवान यांनी बॉबीला शिवीगाळ करून क्रिकेटच्या बॅटने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत बॉबी गंभीरित्या जखमी झाला आहे.    

उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार- 

या घटनेनंतर बॉबी ने उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केले असता पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पऱ्हाड हे करीत आहेत. 

logo
marathi.freepressjournal.in