कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत हनुमान सहकारी दूध संस्था घोटवडे ता.राधानगरी या संस्थेच्या दूध उत्पादकांनी राधानगरी तालुका दूध उत्पादकांची नागरी सह. पतसंस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या २० म्हैशी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हैशी घोटवडे ता. राधानगरी येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम दूध उत्पादक, शेतक-यासाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. या अनुषंगाने परराज्यातून म्हैस खरेदी करण्याच्या आव्हानास चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक दूध उत्पादक परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी उस्पुर्तपणे जात असून यामध्ये युवा दूध उत्पादकांचा सहभाग वाढत आहे. भविष्यात ही युवकांनी दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित भोगावती साखर कारखान्याचे संचालक धिरज डोंगळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे, शाकिर पाटील, संकलन अधिकारी सर्जेराव पाटील, सहा. अधिकारी राजू चौगले, सुहास डोंगळे, शिवाजी डोंगळे, पशुसंवर्धन डॉ.संजय डोंगळे, सचिव संघटना जिल्हाध्यक्ष के.द.पाटील, प्रकाश कातिवले, दयानंद कातिवले, अतुल डोंगळे, राजाराम डोंगळे सर्व संचालक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.