बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? युगेंद्र पवार विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक

“बारामती हा मतदारसंघ इतर कोणाच्याआधी शरद पवारांचा आहे. त्याच मतदारसंघातून शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी...
युगेंद्र पवार यांचे संग्रहित छायाचित्र
युगेंद्र पवार यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

प्राजक्ता पोळ/मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर बारामती मतदारसंघात पुन्हा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. श्रीनिवास पवार (अजित पवारांचे मोठे बंधू) यांचे पुत्र युगेंद्र पवार हे बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. “बारामती हा मतदारसंघ इतर कोणाच्याआधी शरद पवारांचा आहे. त्याच मतदारसंघातून शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी नक्की चांगले काम करून दाखवेन,” असे ‘नवशक्ति’ला सांगत युगेंद्र पवार यांनी राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार हा युवा चेहरा समोर आणला जात आहे. अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी “आमचा भावी नाही तर फिक्स एकच..!” असे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. याबाबत बोलताना युगेंद्र पवार सांगतात, “कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मी निवडणूक लढणार की नाही, हे महाविकास आघाडीचे नेते आणि शरद पवार ठरवतील. जर कुटुंबाचा आणि शरद पवारांचा आशीर्वाद असेल तर निवडणूक लढवण्यासाठी काय हरकत आहे.”

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढण्याचे भाष्य केले. त्यामुळे बारामतीत अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in