फ्लॅटसाठी घेतलेल्या १ कोटी ३० लाखांचा अपहार

फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटी तीस लाखांचा अपहार करून एका मोबाईल व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे.
फ्लॅटसाठी घेतलेल्या १ कोटी ३० लाखांचा अपहार

मुंबई : फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटी तीस लाखांचा अपहार करून एका मोबाईल व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. महेंद्र पद्मसिंह वेद, उषा महेंद्र वेद आणि खुशबू महेंद्र वेद अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विराराम लासाराम पुरोहित हे बोरिवली परिसरात राहत असून, मार्च २०२२ रोजी त्यांनी त्यांच्या मित्राला फ्लॅट विकत घेण्याबाबत विचारणा केली होती.

यावेळी त्यांच्या मित्राने त्याच्या परिचित मित्र महेंद्र वेद याच्या मालकीचा बोरिवलीतील चिकूवाडी, जॉगर्स पार्कजवळील पारसमनी अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅटची विक्री करायची आहे असे सांगून त्यांची महेंद्रसोबत भेट घडवून आणली होती. ६४६ चौ. फुटाचा टू बीएचके असलेल्या या फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांना तो फ्लॅट आवडला होता. त्यामुळे त्याने फ्लॅटचे मालक असलेल्या महेंद्र वेद व त्याची पत्नी उषा वेदशी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीबाबत बोलणी सुरू केली होती. यावेळी त्यांनी फ्लॅटची किंमत दिड कोटी रुपये सांगितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला एक कोटी तीस लाख रुपये देण्याचे मान्य केले. या रक्कमेबाबत त्यांच्यात एकमत झाले आणि वेदने तो फ्लॅट विराराम यांना विक्री करण्याचे आश्‍वासन दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in