पश्चिम रेल्वेवरील एसी प्रवास सुसाट ; ७ महिन्यात तब्बल १ कोटी प्रवाशांचा प्रवास; पश्चिम रेल्वेची माहिती

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यात तब्बल १ कोटी प्रवाशांनी या एसी लोकलमधून प्रवास केला
पश्चिम रेल्वेवरील एसी प्रवास सुसाट ; ७ महिन्यात तब्बल १ कोटी प्रवाशांचा प्रवास; पश्चिम रेल्वेची माहिती

उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला मधल्या काळात प्रवाशांकडून प्रचंड विरोध केला जात होता. आजतागायत काही प्रवासी एसी लोकलऐवजी साधारण लोकल चालवण्याची मागणी करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यात तब्बल १ कोटी प्रवाशांनी या एसी लोकलमधून प्रवास केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत यंदा ८० टक्के वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली एसी लोकल धावली. सुरुवातीला अल्प प्रतिसाद असलेल्या या एसी लोकलमधून सद्यस्थितीत लाखो प्रवासी दैनंदिन प्रवास करत आहेत. पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या होतात. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात आणखी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दररोजची सर्वाधिक तिकीट विक्री १५ हजार ७८९ होती. आता १९ हजारपेक्षा जास्त तिकीटे विकली जात आहेत. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी मोटरकोच डब्यातील उपकरणे लोकलच्या डब्यात बसविलेली पहिली वातानुकूलित लोकल लवकरच पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या लोकलच्याही साधारण दहा फेऱ्या होतील. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलेले बदल

- प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

- प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी मोटरकोच डब्यातील उपकरणे लोकलच्या डब्यात बसवण्यात आली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in