पश्चिम रेल्वेवर एकाच दिवसात १ लाख प्रवाशांचा एसी लोकलने प्रवास

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
पश्चिम रेल्वेवर एकाच दिवसात १ लाख प्रवाशांचा एसी लोकलने प्रवास

पश्चिम रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेल्या फेऱ्यानंतर दिवसागणिक एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या १६ ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेवर १ लाख प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस म्हणजेच पीक टाइममध्ये एसी लोकलच्या सेवा पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. नुकतेच १६ ऑगस्ट रोजी एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांनी १ लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. दैनंदिन प्रवाशांच्या मागील सर्वोत्तम प्रवाशांच्या तुलनेत ही प्रवासी संख्या १९% अधिक आहे. एप्रिल महिन्यापासूनच प्रवासी संख्या वाढत असून सध्या पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकल सेवांची संख्या ४८ एवढी झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in