
मुंबई : वातानुकूलित लोकलना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आणखी १० वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ६ नोव्हेंबरपासून वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत धावेल. आणखी १० लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याने मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ६६ फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या १ हजार ८१० राहणार आहे. या १० सेवांपैकी एक सकाळची आणि एक संध्याकाळची गर्दीच्या वेळेस असेल. या वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी धावणार नाहीत.
सुटण्याचे ठिकाण - प्रकार - सुटण्याची वेळ पोहोचण्याची वेळ
-कल्याण - धीमी - ०७. १६ - छ. शिवाजी महाराज टर्मिनस -०८. ४५
-छ. शिवाजी महाराज टर्मिनस - धीमी - ०८.४९ - कल्याण १०. १८
-कल्याण - धीमी - १०. २५ -छ . शिवाजी महाराज टर्मिनस ११. ५४
-छ . शिवाजी महाराज टर्मिनस - धीमी - ११. ५८ अंबरनाथ -१. ४४
-अंबरनाथ -धीमी - २. ०० - छ . शिवाजी महाराज टर्मिनस ३. ४७
-छ . शिवाजी महाराज टर्मिनस - धीमी - ४. ० डोंबिवली - ५. २०
-डोंबिवली - धीमी - ५. ३२- परळ - ६. ३८
-परळ -धीमी - ६. ४०- कल्याण - ७. ५४
कल्याण - धीमी - ८. १० - परळ- ९. २५
परळ - धीमी -९. ३९ कल्याण -१०. ५३