आणखी १० एकमजली, ५ नव्या एसी डबलडेकर सेवेत

या बसेस शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणखी १० एकमजली, ५ नव्या एसी डबलडेकर सेवेत

मुंबई : आरामदायक व गारेगार प्रवास करता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात वातानुकूलित बसेसचा ताफा दाखल केला जात आहे. १० नवीन इलेक्ट्रिक एसी सिगल डेकर, तर ५ नवीन एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन १० एकमजली विद्युत बस मुंबई सेंट्रल आगारातून प्रवर्तित करण्यात येणार असून, या बसगाड्या ए-३५१ बसमार्गावर, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीजसंग्राही केंद्र (चेंबूर) या दरम्यान प्रवर्तित करण्यात येत आहेत. या बसगाड्यांची लांबी १२ मीटर आहे, तर ५ नव्या दुमजली बस कुलाबा आगारामार्फत बसमार्ग क्र. ए-१३८ व ए-११५ या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन.सी.पी.ए. या दरम्यान प्रवर्तित करण्यात येत आहेत. यापूर्वी बेस्टच्या ताफ्यात २० दुमजली बस असून, या सर्व दुमजली बसगाड्या सकाळी ८.४५ वाजल्यापासून दर ३० मिनिटांच्या कालांतराने बसमार्ग क्र.ए-११५ व ए १३८ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन.सी.पी.ए. व बॅकबे आगार या दरम्यान कार्यान्वित करण्यात येत आहेत.

या बसगाड्या पर्यावरणपुरक असून, या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदुषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हींची सुविधा देण्यात आली आहे. या शिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही सदर बसमध्ये असून प्रवाशांना या दुमजली बसगाडीमध्ये प्रवास करताना अतिरिक्त बसभाडे न देता, इतर सर्वसाधारण एकमजली बसगाड्यांमध्ये प्रवास करतानाचे बसभाडे द्यावे लागत आहे.

'अशा' राहणार सुविधा

या बसगाड्या पर्यावरणपुरक असून, या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदूषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हींची सुविधा देण्यात आली आहे. या शिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही सदर बसमध्ये असून, प्रवाशांना या दुमजली बसगाडीमध्ये प्रवास करताना अतिरिक्त बसभाडे न देता, इतर सर्वसाधारण एकमजली बसगाड्यांमध्ये प्रवास करतानाचेच बसभाडे द्यावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in