गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या १० उपनगरीय विशेष गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत
गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या १० उपनगरीय विशेष गाड्या
ANI
Published on

९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी संपन्न होणार आहे. गणपती विसर्जनानिमित्त प्रवाशांच्या सोईस्कर प्रवासासाठी मध्य रेल्वेद्वारे १० सप्टेंबर रोजी (९/१०.९.२०२२ मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री १.३० वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून १.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २.०० वाजता पोहोचेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून २.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३.०० वाजता पोहोचेल. याशिवाय कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.१० वाजता पोहोचेल. तर ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरही सकाळी ४ पर्यंत सुविधा

अप मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून १.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २.२० वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून १.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३.०५ वाजता पोहोचेल. याशिवाय डाऊन मार्गावर पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे २.५० वाजता पोहोचेल. तर पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल.अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in