धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वडिलांनी त्यांच्या ओळखीचा व्यक्ती कांतालाल यादव याच्या गाडीमध्ये हर्षला बसवून घरी चिर्ले गावाजवळ सोडण्यास सांगितले. मात्र
चिमुकल्याची हत्या
चिमुकल्याची हत्याप्रतिकात्मक फोटो

विशेष प्रतिनिधी

उरण : बुधवारी खोपटे- करंजा कोस्टल रोडवर एका दहा वर्षाच्या मुलाचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हर्ष यादव असं मृत मुलाचे नाव असून तो चिर्ले येथील रहिवासी होता. तर हर्षच्या हत्येप्रकरणी त्याच्या वडिलांचा मित्र कांताराम सिताराम यादव यास पोलिसांनी अटक केली आहे.

मित्रानंच केला घात...

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष यादव याचे कुटूंब चिर्ले येथे राहत होते. आई गावाला गेल्यामुळे हर्ष आपल्या वडीलांसोबत राहत होता. हर्षचे वडील बिंदूराम यादव हे ड्रायव्हर आहेत. हर्षचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणीही नसल्यामुळे त्याचे वडील त्याला ड्यूटीवर जाताना सोबत घेवून जात असत. असेच एका सीएफएसमध्ये मालाची डिलिव्हरी घेवून गेले असता तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं. लहान मुलाना सीएफएसमध्ये प्रवेश नसल्याचं सुरक्षारक्षकांनी सांगितलं. म्हणून वडलांनी त्यांच्या ओळखीचा व्यक्ती कांतालाल यादव याच्या गाडीमध्ये हर्षला बसवून घरी चिर्ले गावाजवळ सोडण्यास सांगितले. मात्र कांतालाल याने हर्ष याला घरी न सोडता आपल्या सोबत ठेवले आणि त्याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर हर्षचा मृतदेह खोपटे-करंजा कोस्टल रोडच्या खाडी किनारी फेकून दिला.

जुन्या भांडणाच्या रागातून चिमुकल्याची हत्या....

वडीलांनी घरी आल्यानंतर मुलाचा शोध घेतला असता मुलगा सापडला नाही म्हणून कांताराम यादव याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. हर्ष आणि कांताराम सापडत नसल्याने बिंदुराम यादव याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मात्र त्याच दरम्यान एका सुरक्षा रक्षकाला भेंडखळच्या खाडीत एका दहा वर्षाच्या मुलाचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने तपास करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कांतालाल यादव याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच कांतालाल याने जुन्या भांडणाचा राग म्हणून हर्षची हत्या केल्याची कबूली दिली. बिंदूराम यादव याना हर्ष हा एकूलता मुलगा होता. हर्षच्या हत्येमुळे त्यांचे कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

logo
marathi.freepressjournal.in