अंबादास दानवेंविरोधात किरीट सोमय्यांचा१०० कोटींचा दावा

मुंबई हायकोर्टात तिघांविरोधात १०० कोटींच्या स्वतंत्र अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली आहे.
अंबादास दानवेंविरोधात किरीट सोमय्यांचा१०० कोटींचा दावा

मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह तिघांविरोधात किरिट सोमय्यांनी दाखल केलेल्या १०० कोटींच्या दाव्याची उच्च न्यायालयाने दखल घेतली; मात्र दानवे आणि टिव्ही चॅनेल यांच्यामुळे पत्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने न्यायमूर्ती एस. एन. मोडक यांनी सोमय्यांना दाव्यात दुरूस्ती करण्याची मुभा देत दाव्याची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.

किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला. त्यानंतर सोमय्या यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. याचदरम्यान अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात सोमय्या यांच्या व्हिडीओचा मुद्दा उचलून धरला. सोमय्यांनी अनेक महिलांशी संपर्क केला, असा दावा करीत दानवे यांनी सभागृहात पेनड्राईव्ह सादर केला, तर हा व्हिडिओ एका चॅनेलने दाखवला, तर एका युट्युब चॅनेलवर ही प्रसारित केला. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या वतीने अ‍ॅड. आदित्य भट्ट यांनी मुंबई हायकोर्टात तिघांविरोधात १०० कोटींच्या स्वतंत्र अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in