मुंबईतील रस्त्यांचे वर्षभरात १०० टक्के क्राँकीटीकरण

या रस्त्यांच्या क्राँकीटीकरणासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचेही त्‍यांनी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांचे वर्षभरात १०० टक्के क्राँकीटीकरण
Published on

मुंबईतील रस्त्यांचे येत्या वर्षभरात १०० टक्के क्राँकीटीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी या रस्त्यांच्या क्राँकीटीकरणासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचेही त्‍यांनी सांगितले.

 मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलापर्यंतच्या रस्त्याला विशेष पायाभूत सुविधेचा दर्जा देण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा कॉम्प्लेक्सपर्यंतच्या १२० फुटी रस्त्यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्ि‍थत केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.

logo
marathi.freepressjournal.in