मालाड पूर्वेला १०५ कोटींचा सिमेंट कॉँक्रीट रस्ता

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.
मालाड पूर्वेला १०५ कोटींचा सिमेंट कॉँक्रीट रस्ता

मुंबई : मालाड पूर्वेला डीपी रोड ते रिझव्हायर रोड दरम्यान एक ते दीड किलोमीटरचा सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे. यासाठी १०५ कोटी २३ लाख ३३ हजार ३१० रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, पात्र कंत्राटदाराला पावसाळा वगळून १८ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मालाड पूर्वेला खाजगी डीपी रोड असून त्याठिकाणी सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याठिकाणी चांगला रस्ता करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. खाजगी डीपी रोड आरक्षित झाल्याने आता सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.

पी उत्तर विभागातील पोलीस स्टाफ क्वॉर्टर्ससाठी मालाड पूर्वेची खाजगी आरक्षित जागा सीटीएस नं. ८२७ए/४ए/२ प्लॉट कनेक्टिंग व व्हिलेज मालाड पूर्वेचा धारण केलेला सीटीएस नं. ८२७ए/४ए/१ (पार्ट) जमिनीवरील पोलीस हाऊसिंग प्लॉटचा मंजूर झालेल्या १८.३० एम डीपी रोडपासून ते रेझव्र्हायर रोडपर्यंत विकास करण्यात येणार आहे. याठिकाणी एक ते दीड किलोमीटर सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in