११ लाख ११ हजार मातीच्या दिव्यांनी साकारली अखंड भारतमाता ;वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद

उपखंडाच्या नकाशावर (अखंड भारत) एकूण ४०,५०० चौरस फूटमध्ये २७० फूट × १५० फूट आकाराचे भारत मातेचे सर्वात मोठे मोझॅक पोर्ट्रेट तयार केले
११ लाख ११ हजार मातीच्या दिव्यांनी साकारली अखंड भारतमाता ;वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद

मुंबई : राष्ट्र, सांस्कृतिक एकता, अध्यात्म, विविधता आणि लोकांमधील राष्ट्रीय आकांक्षेला सलाम करण्यासाठी. 'श्री राम कर्मभूमी न्यास' आणि 'मिशन वंदे मातरम फाउंडेशन' बिहार, भारत आयोजित उत्सव कार्यक्रम 'मेरे देश की धरती - एक दीप राष्ट्र के नाम' (संस्थापक, संरक्षक) आणि समन्वयक, श्री अर्जित शाश्वत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा कलाकारांनी भारतीय उपखंडाच्या नकाशावर (अखंड भारत) एकूण ४०,५०० चौरस फूटमध्ये २७० फूट × १५० फूट आकाराचे भारत मातेचे सर्वात मोठे मोझॅक पोर्ट्रेट तयार केले. ११ लाख ११ हजार १२ रंगीत छटामध्ये मातीचे दिवे वापरून ४ नोव्हेंबर रोजी क्रीडा संकुल, पशुवैद्यकीय मैदान, पाटणा, बिहार, भारत येथे नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

त्यांच्या या विश्वविख्यात रेकॉर्डची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया चीफ एडिटर आणि फाउंडर सुषमा नार्वेकर आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सिनिअर एज्युकेटर संजय नार्वेकर यांनी घेतली. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले भारताचे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि बिहारचे राज्यपाल राजीव आर्लेकर यांच्याद्वारे 'श्री राम कर्मभूमी न्यास' आणि 'मिशन वंदे मातरम फाउंडेशन' संस्थापक, आणि समन्वयक, अर्जित शाश्वत आणि सहा कलाकारांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in