विक्रोळीत ११०७ बाटल्या रक्त जमा

शिबिराचे उद्घाटन भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सोनावणे यांच्या हस्ते झाले.
विक्रोळीत ११०७ बाटल्या रक्त जमा

मुंबई : विक्रोळीतील विकास कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील एन.एस.एस. युनिट व लायन्स क्लब ऑफ मिलेनियम यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार नेते कै. डॉ. दत्ता सामंत यांच्या २७व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ११०७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टिळक महाराष्ट्र विद्यापीठ माहिती केंद्राचे संचालक प्रा. विकास प. राऊत यांनी भूषविले. शिबिराचे उद्घाटन भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सोनावणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. हरीश पांचाळ तसेच पृथ्वी फिनमार्ट प्रा.लि. चे वरिष्ठ लेखापाल व्यवस्थापक विजय निकम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे चिटणीस डॉ. विनय राऊत, विश्वस्त डॉ. मेघा शेट्टी, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी व्ही. व्ही. मुळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in