११७ स्थानके डिजिटल देखरेखीखाली मध्य रेल्वेच्या स्थानकांवर अद्यावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

कॅमेऱ्यांमधून गोळा केलेला डेटा आयपी नेटवर्कद्वारे मॉनिटरिंग स्टेशनवर प्रसारित केला जाईल
११७ स्थानके डिजिटल देखरेखीखाली मध्य रेल्वेच्या स्थानकांवर अद्यावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

मुंबई : रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणारी प्रणाली असलेले कॅमेरे बसवण्यात येणार असून, वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यात या अद्यावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होणार आहे. मध्य रेल्वेने ११७ स्थानकांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण या स्थानकांवर याआधीच अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. ही ११७ स्थानके डिजिटल देखरेखीखाली असतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वे रेल टेलच्या मदतीने एक १, एक, बी व सी श्रेणीच्या स्थानकांवर निर्भया फंडातून ३,६५२ सीसीटीव्ही कॅमेरे असलेली व्हिडिओ प्रणालीचा ही समावेश आहे. याबाबतचा सामंजस्य करार यापूर्वीच रेल्वे बोर्ड आणि रेलटेल यांच्यात झाला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा ओळखण्याची यंत्रणा, व्हिडीओ अॅनालिटिक्स, व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम असेल आणि मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांवर व २४७ डी अँड ई श्रेणी स्थानकांवर २,४७० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. फेस रेकग्निशन सिस्टीम, व्हिडीओ अॅनालिटिक्स, व्हिडीओ मॅनेजमेंट सिस्टीम असलेले कॅमेरे प्रवाशांची सुरक्षा वाढवतील, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवतील, कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना आळा घालतील आणि रेल्वे नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवतील. पीटीझेड प्रकारचे कॅमेरे आरपीएफ कर्मचाऱ्यांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. हे कॅमेरे सुरक्षा एजन्सींना गर्दीवर लक्ष ठेवण्यास, सोडलेल्या वस्तू शोधण्यात आणि स्थानकांवर अतिक्रमण रोखण्यास मदत करतील, असे ही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गुन्हेगार असल्याचा 'अलर्ट' मिळणार!

या कॅमेऱ्यांमधून गोळा केलेला डेटा आयपी नेटवर्कद्वारे मॉनिटरिंग स्टेशनवर प्रसारित केला जाईल आणि पुढे एकात्मिक नियंत्रण कमांड सेंटरमध्ये प्रसारित केला जाईल. हे कॅमेरे डेटाबेसमध्ये ज्याचा चेहरा संग्रहित केला जाणार आहे. विशेष म्हणजे गुन्हेगार स्थानकात प्रवेश करताच ओळखीच्या गुन्हेगार स्थानकात असल्याची माहिती प्रशासनाला ताबडतोब मिळणार आहे. हे कॅमेरे चेहऱ्याचे विविध डोळ्यातील पडदा किंवा कपाळ ओळखला जाणार आहे.

'या' ठिकाणी नजर!

हा प्रकल्प वेटिंग हॉल, रिझर्व्हेशन काउंटर, पार्किंग एरिया, मुख्य प्रवेश/एक्झिट गेट्स, प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज आणि बुकिंग ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची खात्री देतो, हे सर्व ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे नेटवर्कशी जोडलेले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in