जेजे उड्डाणपुलावर १२ कोटींची लाईटिंग; मुंबईकरांचा संताप; सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने पैशांची उधळपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जेजे उड्डाणपुलावर १२ कोटींची लाईटिंग; मुंबईकरांचा संताप; सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने पैशांची उधळपट्टी

मुंबई : मुंबईचे सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत जेजे उड्डाणपुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. अडीच किलोमीटर लांब असलेल्या जेजे उड्डाणपुलावर लाईटिंगसाठी तब्बल १२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र एका उड्डाणपुलावर १२ कोटींची लाईटिंग करणार म्हणजे काय करणार, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात झाडांवर आकर्षक विद्युत रोषणाई, पुलाखाली रंगरंगोटी, समुद्रकिनारी सौंदर्यीकरण अशी १२०० कामे हाती घेतली असून ९१४ कामे पूर्ण झाली आहेत. यावर ७१५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र सौंदर्यीकरणावर करण्यात आलेल्या खर्चानंतर अनेक झाडांवरील लाईटिंग बंद आहे. पुलाखालील रंगरंगोटीचा कलर उडाला आहे. तरीही जेजे उड्डाणपुलावर लाईटिंग करण्यात येणार असून यासाठी १२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

अशी होता आहेत कामे

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्रकिनाऱ्‍यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची कामे करण्यात येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in