विधानपरिषदेवर लवकरच १२ सदस्यांच्या नेमणुका होणार ?

विधानपरिषदेवर लवकरच १२ सदस्यांच्या नेमणुका होणार ?

महाविकास आघाडी सरकारने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव वर्षापूर्वी पाठवला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. गणरायाच्या दर्शनानिमित्ताने फडणवीस राजभवनावर गेले असताना आता विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका लवकरच होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

महाविकास आघाडी सरकारने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव वर्षापूर्वी पाठवला होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ४ सदस्य होते. त्याला अद्याप राज्यपाल यांनी मंजुरी दिलेली नाही. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीची यादी रद्द करावी, असे पत्र राजभवनला पाठवले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच १२ सदस्यांच्या नियुक्त्या मार्गी लावेल, असे समजते. त्यासंदर्भात रविवारी फडणवीस आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. मात्र, ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. कलम १६३ (१) अंतर्गत विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करू शकतात. तर कलम १७१ (५) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in