शिवसेनेतील १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात,गटात येण्याची औपचारिकता शिल्लक
शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडाचे वादळ शमले नसतानाच आता शिवसेनेतील सुमारे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. या खासदारांशी बैठका घेण्यात आल्या असून ते फक्त शिंदे गटात येण्याची औपचारिकताच शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
गजानन किर्तीकर, विनायक राऊत, अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर हे ठाकरे आणि शिवसेनेशी निष्ठावंत असल्याने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत. उर्वरित सर्व खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार आहेत. त्यानंतर मूळ शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट ८४ जिल्हा प्रमुख आणि शाखा प्रमुखांपैकी ६० जणांना सोबत आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या कार्यालयांवरही शिंदे गटाचेच नियंत्रण असेल, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.