दादर-एलटीटी-गोरखपूरदरम्यान १२ विशेष गाड्या, गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

या सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील.
दादर-एलटीटी-गोरखपूरदरम्यान १२ विशेष गाड्या, गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता दादर-गोरखपूर, एलटीटी- गोरखपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- दानापूरदरम्यान अनारक्षित १२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्या चालवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

- दादर-गोरखपूर अनारक्षित विशेष (६ फेऱ्या)

०१०१५ अनारक्षित विशेष २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून १२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)

०१०१६ अनारक्षित विशेष गोरखपुर येथून २९ एप्रिल ३ मे आणि ६ मे रोजी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)

- या थांब्यावर थांबणार

ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

- एलटीटी-गोरखपूर अनारक्षित विशेष (४ फेऱ्या)

०१४२७ अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ एप्रिल आणि १ मे रोजी ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

०१४२८ अनारक्षित विशेष गोरखपूर २८ एप्रिल आणि ३ मे रोजी ३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

या थांब्यावर थांबणार

ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

यूटीएस प्रणालीद्वारे बुकिंग

वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in