‘हायड्रॉलिक पार्किंग’ निविदा प्रक्रियेत १२५ कोटींचा घोटाळा

‘हायड्रॉलिक पार्किंग’ निविदा प्रक्रियेत १२५ कोटींचा घोटाळा

चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई : पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने हायड्रोलिक पार्किंग योजना आणली. वरळी आणि बोरिवली येथील हायड्रोलिक पार्किंगसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. दोन्ही ठिकाणी पार्किंग निविदा प्रक्रियेत १०० ते १२५ कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक आशरफ आझमी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) यांच्याकडून याबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही आझमी म्हटले आहे. यापूर्वी माटुंगा येथे पालिकेने हायड्रोलिक पार्किंगसाठी मंजूरी देण्यात आलेली निविदा ३ टक्के कमी दराने होती. वरळी आणि बोरिवली येथे ३५ टक्के वाढीव दराने कशी देण्यात आली, असा सवाल त्यांनी केला आहे. सुमारे ५५० कार पार्किंगसाठी १६५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती, त्यासाठी पालिका २१९ कोटी रुपये देणार आहे. ही रक्कम नियोजित खर्चाच्या सुमारे ५५ कोटी अधिक असून यावर आझमी यांनी आक्षेप घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in