५ महिन्यात मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून १२९.१६ कोटींची कमाई

यंदा मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून ३२.७३ कोटी एवढा महसूल मिळाला आहे. याच कालावधीत गतवर्षी १०.९६ कोटी एवढा महसूल मिळाला होता
५ महिन्यात मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून १२९.१६ कोटींची कमाई

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पार्सल वाहतुकीतून चांगला महसूल मिळवला आहे. यंदा मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून ३२.७३ कोटी एवढा महसूल मिळाला आहे. याच कालावधीत गतवर्षी १०.९६ कोटी एवढा महसूल मिळाला होता. मात्र यंदा विक्रमी महसुलासह १९८% ची प्रभावी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर २०२२ मध्ये २६१.५० लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह २९ भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल करार ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहेत.

पार्सल वाहतुकीसोबत अमरावती, अकोला, भुसावळ, नाशिकरोड आणि शेगाव येथील रेल कोच रेस्टॉरंटसाठी वार्षिक १३०.६३ लाख रुपयांच्या महसूलाचे करार रेल्वेला प्राप्त झाले असून ५ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक महसूलासह रेल कोच रेस्टॉरंट्स उभारण्यासाठी कंत्राटे देण्यात आली आहेत. भुसावळ गुड्स यार्डमधील बॉक्स एन प्रकारच्या वॅगन्सच्या साफसफाईचे कंत्राट ५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले असून ३०२.८४ लाख महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय अकोला, भुसावळ, जळगाव आणि नाशिकरोड येथे २४x७ आपत्कालीन वैद्यकीय कक्षांचे कंत्राट ५ वर्षांच्या कालावधीसाठी रुपये २२.२५ लाख वार्षिक महसूलासह देण्यात आले आहे. यासोबत नागपूर साईडिंग येथील गुड्स शेडच्या कामाची कार्यक्षमता आणि स्वच्छतेसाठी १५ लाख रुपयांच्या महसूलासह एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या ८९ सीटिंग कम लगेज रेक आणि १३ पार्सल व्हॅन लीजवर आहेत. त्यापैकी २४ सीटिंग कम लगेज रेक आणि एक पार्सल व्हॅन अलीकडेच ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in