अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांकडून १३ लाखांचा दंड वसूल;अन्न आणि औषध प्रशासनाने केली कारवाई

राज्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत याकरीता एफडीएकडून सातत्याने विशेष मोहीम राबवल्या जातात
अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांकडून १३ लाखांचा दंड वसूल;अन्न आणि औषध प्रशासनाने केली कारवाई
Published on

राज्यामध्ये अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात येते. त्यानुसार वर्षभरामध्ये एफडीएने विविध हॉटेल चालक, अन्न पदार्थ विक्रेते यांच्यावर केलेल्या कारवाईतून १३ लाखांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये तडजोडीच्या आणि न्याय प्रक्रियेतून लावण्यात आलेल्या दंडाचा समावेश आहे.

राज्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत याकरीता एफडीएकडून सातत्याने विशेष मोहीम राबवल्या जातात. त्यानुार, अन्न व औषध प्रशासनाने २०२१पासून आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणांहून १७९७ अन्नाचे नमुने घेतले. यातील १०६२ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले. तर १०३ नमुने हे कमी दर्जाचे, तर ३८ नमुन्यांवर दिशाभूल करणारे लेबल लावण्याचे व १२ नमुने हे वापरण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे आढळून आले. तर ५०० पेक्षा अधिक नमून्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

एफडीएकडून केलेल्या या कारवाईमध्ये एप्रिलपासून आतापर्यंत १६१ जणांविरोधात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

यातील १३ अर्जांचा तडजोडीसाठी दाखल करण्यात आले. त्यातील ११ अर्जांवर तडजोड करत १ लाख ५५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे न्यायनिर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून १४८ अर्ज दाखल करण्यात आले असून दाखल अर्जांपैकी ३१ अर्जांवर न्यायनिवाडा झाला आहे.

न्यायनिवाडा झालेल्या ३१ अर्जांवरील सुनावणीतून अन्न व औषध प्रशासनाने ११ लाख ८८ हजार इतका दंड वसूल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in