हृदयविकाराच्या झटक्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

किशोर गधे हा योगासन करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला
हृदयविकाराच्या झटक्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई : कांदिवलीमध्ये शाळकरी मुलाला योगासन करतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कांदिवलीमध्ये एका शाळेला जाणाऱ्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किशोर गधे असे शाळकरी मुलाचे नाव असून, तो मूळचा जामनगरचा आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून तो शाळेसाठी व अभ्यासासाठी मुंबईतील कांदिवलीमध्ये राहत होता. अभ्यासात हुशार असणारा किशोर गधे हा शांत आणि मनमिळावू असा मुलगा होता. किशोर गधे हा योगासन करत होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in