नवरात्रोत्सवात १३०४ मंडळांना पालिकेकडून परवानगी

यंदाचा नवरात्रोत्सव मुंबईकरांसाठी सुरक्षित पार पडावा यासाठीची खबरदारी पालिकेकडून घेण्यात आली
नवरात्रोत्सवात १३०४ मंडळांना पालिकेकडून परवानगी

गणेशोत्सवानंतर मुंबईत नवरात्रोत्सवाची धुम पहावयास मिळत आहे. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या १,७०० सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी मुंबई शहर व उपनगरातील १,३०४ मंडळांना परवानगी देण्यात आल्याचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले. दरम्यान, नवरात्रोत्सवासाठी पालिकेने विसर्जन स्थळांसह काही भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था कायम ठेवली आहे. मुंबईत नवरात्रौत्सवासाठी पालिकेकडून विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव मुंबईकरांसाठी सुरक्षित पार पडावा यासाठीची खबरदारी पालिकेकडून घेण्यात आली आहे.

मुंबईत आतापर्यंत १३०४ नवरात्रोत्सव मंडळाना परवानगी देण्यात आली आहे. एकुण १७०० नवरात्रोत्सव मंडळांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले होते. यामध्ये काही मंडळांनी दुबार अर्ज केले होते. अशा मंडळांनी संख्या २५० इतकी होती. तर महापालिकेकडून एकुण १६२ नवरात्रोत्सव मंडळांचे अर्ज हे काही कारणात्सव फेटाळण्यात आल्याचेही बिरादार यांनी सांगितले. नवरात्रोत्सव कालावधीत विसर्जनाच्या सुविधेअंतर्गत वीज, खड्डेमुक्त रस्ते तसेच बोटी, डॉक्टर्स अशी सुविधा पालिकेकडून देण्यात आली आहे. तर नैसर्गिक ठिकाणीही देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची सुविधा पालिकेने पुरवल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक स्थळांसोबतच पालिकेकडून कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही विसर्जनाचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in