भंगारातून मध्य रेल्वेची १३२ कोटींची कमाई

वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे ३०० कोटींचे उद्दिष्ट पार करण्याच्या वचनबद्धतेवर मध्य रेल्वे अथकपणे काम करत आहे
भंगारातून मध्य रेल्वेची १३२ कोटींची कमाई
Published on

मुंबई : झिरो स्क्रॅप मिशनला प्राधान्य देत जुन्या लोको, डिझेल सरप्लस लोको, नॉन-ऑपरेशनल रेल्वे मार्गिका आणि अपघातग्रस्त लोको/कोच यासह विविध प्रकारच्या भंगारांची विकून मध्य रेल्वेने १३२.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १५ ऑगस्ट दरम्यान रेल्वे बोर्डाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २०.४१% ची लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

५६६९ मॅट्रिक टन रेल्वे/पी-वे, ०९ लोकोमोटिव्ह, १३३ कोच, ५३ वाघिणी विकल्या. तर मुंबई विभागाने २४.३६ कोटी रुपयांचे भंगार विकले. भुसावळ मंडळाने १७.९९ कोटी, सोलापूर परिमंडळाने ८.९ कोटी, नागपूर विभागाने ९.६६ कोटींची, पुणे मंडळाने १४.३३ कोटी, माटुंगा डेपोने २३.५६ कोटी, इलेक्ट्रिक लोको शेड डेपो, भुसावळने १३.५० कोटींची भंगार विक्री केली.

झिरो स्क्रॅप मिशनच्या कक्षेत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा प्राप्त करण्यासोबतच २०२३-२४ या वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे ३०० कोटींचे उद्दिष्ट पार करण्याच्या वचनबद्धतेवर मध्य रेल्वे अथकपणे काम करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in