१.३३ कोटींच्या वीज चोरीचा पर्दाफाश

अदाणी इलेक्ट्रिकसिटीच्या दक्षता पथकाची कारवाई; कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
File photo
File photo

मुंबई : मालाड पूर्व कुरार गावात इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय करणारी जैनी ट्रेडर्स हे थ्री-फेज थेट वीज पुरवठा वापरल्याप्रकरणी दोषी आढळले. कांदिवली पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३च्या कलम १३५ आणि १५० अंतर्गत संबंधित व्यक्तींविरुद्ध एफआयआर (क्रमांक ०३८४) दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेच्या दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत १.३३ कोटी रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाला आहे. हंसा रमेश भूषण, प्रभु रतन गामी, निलेश मनसुखलाल कामदार, आणि सुभाष रामजी गुप्ता यांच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षता पथकाला या परिसरात गेल्या काही महिन्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्या; मात्र तात्काळ कारवाई करण्यासाठी पुरेशा पुराव्यांची गरज होती. अखेर ठोस पुरावे हाती लागल्यावर एलटी नेटवर्कची सर्वसमावेशक तपासणी करण्यात येऊन विजेची थेट पुरवठा जोडणी आढळून आली. या मोहिमेंतर्गत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. प्रतिकारानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग व्यवसायासाठी थ्री-फेज थेट वीज पुरवठ्याचा बेकायदेशीर वापर उघड करत या कायद्यातील वीज चोरीचे ठोस पुरावे मिळविण्यात यश मिळवले.

logo
marathi.freepressjournal.in