खडसे कुटुंबीयांना १३७ कोटी दंडाची नोटीस; बेकायदेशीर मुरूम उत्खनन केल्याचा ठपका

खडसे कुटुंबीयांना १३७ कोटी दंडाची नोटीस; बेकायदेशीर मुरूम उत्खनन केल्याचा ठपका

सून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत
Published on

मुंबई : बेकायदेशीर माती उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, त्यांची भाजप खासदार सून रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबातील चौघांना १३७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची नोटीस मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी बजावली आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्या मालकीच्या जमिनीतून १.१८ लाख ब्रास मुरूम आणि दगडाचे बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांना १३७. १४ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला असून दंडाची रक्कम नोटीस जारी केल्यापासून १५ दिवसांच्या आत भरावी.

चार दशके भाजपसोबत असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत २०२० मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना यावर्षीच विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले आहे. सून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत.

नाथाभाऊ झुकनेवाला नहीं

‘‘हे माझ्या विरोधकांनी रचलेले षड‌्यंत्र आहे. १३७ कोटी रुपये दंड भरण्याचा विषय नाही. यासंदर्भात अपील करता येते. मी कायम विरोधी पक्षात राहिलेला माणूस आहे. मी सत्तेच्या विरोधात नेहमी बोलतो. आताही सत्ता भाजपची आहे. त्यांची चूक मी लक्षात आणून देतो. त्यामुळे मला छळले जात आहे. परंतु ‘नाथाभाऊ झुकनेवाला नहीं’.

logo
marathi.freepressjournal.in