मार्वे रोड येथे १.४ कोटींच्या वीजचोरीचा पदाफार्श ;अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाची कारवाई

संशयास्पद मीटर रिडिंग आणि वीज वापराच्या पद्धतींमुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने गेल्या काही महिन्यांपासून या रिसॉर्टवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
मार्वे रोड येथे १.४ कोटींच्या वीजचोरीचा पदाफार्श 
;अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाची कारवाई

मुंबई : मालाड पश्चिम येथील मनोरी मार्वे रोडवरील ‘किन्नी फार्महाऊस अँड रिसॉर्ट’मध्ये येथे अनधिकृतरित्या वीज वापरल्याबद्दल मॉरिस बेनी किन्नी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गोराई पोलीस स्टेशन येथे १ डिसेंबर २०२३ रोजी वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या दक्षता पथकाने २९ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईअंतर्गत संबंधित आस्थापनेने एकूण ५.४१ लाख युनिटची चोरी केली असून त्याचे एकूण मूल्य १.०४ कोटी रुपये इतके आहे.

संशयास्पद मीटर रिडिंग आणि वीज वापराच्या पद्धतींमुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने गेल्या काही महिन्यांपासून या रिसॉर्टवर बारकाईने लक्ष ठेवले होते. २९ नोव्हेंबर रोजी दक्षता पथकाच्या चमूला किन्नी रिसॉर्टवर अचानक छापा टाकून मालक बेनी किन्नी यांनी केवळ त्यांच्या रिसॉर्टसाठीच नव्हे तर त्याच आवारातील त्यांच्या बंगल्यासाठीदेखील वीजचोरी केल्याचे आढळून आले होते. दक्षता पथकाने संपूर्ण एलटी नेटवर्क शोधून काढले. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुख्य भूमिगत एलटी सर्व्हिस केबलद्वारे दोन वीजवाहिन्या जोडून अनधिकृत वीज घेतली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. पथकाने अत्यंत कुशलतेने वीजचोरी शोधून काढली आणि रिसॉर्ट मालकाविरुद्ध गोराई पोलीस ठाण्यात प्राथिमिक तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in