महापरिनिर्वाण दिनी मध्य रेल्वेच्या १४ विशेष गाड्या

गर्दी आणि अनुयायांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनी मध्य रेल्वेच्या १४ विशेष गाड्या
Published on

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर सीएसएमटी, सीएसएमटी - दादर ते सेवाग्राम अजनी नागपूर, कलबुरगि - सीएसएमटी, सोलापूर - सीएस एमटी व अजनी ते सीएसएमटी दरम्यान १४ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर रोजी आहे. यादिवशी बाळासाहेबांचे अनुयायी मुंबई व नागपूर मध्ये मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांची अतिरिक्त होणारी गर्दी आणि अनुयायांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ विशेष कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, २ विशेष सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि १ विशेष अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चालविण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in