मुंबई : मुंबईतील ‘टॉप टेन’ मालमत्ता कर थकबाकीदारांनी तब्बल १४७ कोटी २४ लाख ७२ हजार १८ रुपये थकवले आहेत. मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यापैकी काही थकबाकीदारांनी धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
नागरिकांना विविध सेवा-सुविधा देणाऱ्या पालिकेचा ‘मालमत्ता कर’ हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी कर निर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर निर्धारण आणि संकलन विभाग अथक कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ हे संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ ची कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कर वसुलीचे कामकाज सुरु आहे.
बड्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी पाठपुरावा
ए विभागात (१), बी (७), सी (१), डी (४), ई (३३), एफ दक्षिण (१), एफ उत्तर (४), जी दक्षिण (१२), जी उत्तर (३), एच पूर्व (३), एच पश्चिम (७), के पूर्व (५), के पश्चिम (३), पी दक्षिण (६), पी उत्तर (४), आर दक्षिण (४), आर उत्तर (२), आर मध्य (५), एल (५), एम पूर्व (३), एम पश्चिम (९), एन (८), एस (५), टी (५) यांचा समावेश आहे.