मुंबईत १५ महाविद्यालयांना मिळाली मान्यता

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित नव्याने सुरू होणाऱ्या ३७ महाविद्यालयांपैकी १५ नवीन महाविद्यालये विधी शाखेची आहेत.
मुंबईत १५ महाविद्यालयांना मिळाली मान्यता
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित नव्याने सुरू होणाऱ्या ३७ महाविद्यालयांपैकी १५ नवीन महाविद्यालये विधी शाखेची आहेत. तीन आणि पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. भांडुप, बोरिवली, नालासोपारा, महाड, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी ही महाविद्यालये सुरू होणार आहेत.

विधी शाखेबरोबरच कला, विज्ञान, वाणिज्य, डेटा सायन्स, बायो टेक्नॉलॉजी, आयटी, अकाउंटिंग अँड फायनान्स आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यात ३०० हून अधिक संस्थांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन महाविद्यालये सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे इरादा पत्र दिले जाणार आहे. ही नवीन महाविद्यालये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करता येतील. त्याआधी संस्थेला सरकारच्या अटी व शर्तीची पूर्तता करावी लागेल. त्यासंबंधीचा पूर्तता अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकार संस्थांना अंतिम मान्यता देईल. त्याशिवाय या महाविद्यालयांना विद्यापीठाची संलग्नताही मिळणार नाही.

विभागाने काही दिवसांपूर्वी २६४ नव्या महाविद्यालयांना इरादा पत्र देण्याचे आदेश दिले होते. त्यात सर्वाधिक ८२ महाविद्यालये एसएनडीटीला देण्यात आली आहेत. त्यानंतर आणखी ४० हून अधिक संस्थांना इरादापत्र देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in