CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अभियांत्रिकी, विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवार १७ मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून १४ मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.

सीएसएमटी ते भायखळादरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप धीम्या, अप आणि डाउन जलद मार्ग, यार्ड मार्गिका, प्लॅटफॉर्म १० ते १८ दरम्यान सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असेल. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यत (रोज रात्री ६ तास) हा ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय मार्गावर सीएसएमटी ते भायखळादरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२ वाजून १४ मिनिटांनी सुटणार आहे. तर कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल शेवटची लोकल असेल.

प्लॅटफॉर्म १०-११च्या विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात : लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल

दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

२२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस , २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस

पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना

२०१११ सीएसएमटी-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in