मुंबईत आज १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार

क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम ४ ऑगस्टला सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार
मुंबईत आज १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार

मुंबईत गुरुवारी विविध भागांत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे भांडुप संकुल येथील तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) आणि जलवाहिनीबरोबर छेद जोडणीचे काम करण्यात येईल. तसेच केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम ४ ऑगस्टला सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद

१) एस विभाग भांडुप

गावदेवी टेकडी, सर्वोदयनगर, कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम), रमाबाई नगर १ व २, दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर, साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर.

२) एन विभाग घाटकोपर

वीर सावरकर मार्गालगतचा परिसर, विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी गाव, गोदरेज रुग्णालय विक्रोळी (पूर्व), विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी स्थानक ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर, गोदरेज कंपनी, रेल्वे लाईनची पश्चिम बाजूचा परिसर, सर्वोदय नगर क्षेत्र - सर्वोदय रुग्णालय ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर.

३) एल विभाग कुर्ला

बरेली मस्जिद, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर,साकी विहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्य नगर पाईपलाईन, काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, कोहिनूर सिटी, प्रीमियर कॉलनी, बैलबाजार, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गांव, संदेश नगर, शास्त्रीनगर, हलावपूल, न्यू मिल मार्ग, ब्राम्हणवाडी, विनोबा भावेनगर, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, किस्मत नगर, परिघ खाडी, तकियावार्ड, महाराष्ट्र काटा, गफुरखान इस्टेट, पाईपलाईन मार्ग, एल. बी. एस. मार्ग (पूर्व व पश्चिम).

४) के/पूर्व विभाग - अंधेरी

चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहिद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्गक्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in