डेबीट कार्ड क्लोनद्वारे खात्यातून सव्वादोन लाखांची फसवणूक

१३ ऑक्टोंबरला ते काळाचौकी येथील एका एटीएम सेंटरमध्ये दहा हजार रुपये काढण्यासाठी गेले होते; मात्र एटीएममधून पैसे आले नाही.
डेबीट कार्ड क्लोनद्वारे खात्यातून सव्वादोन लाखांची फसवणूक

मुंबई : डेबीट कार्ड क्लोन करुन बँक खात्याची माहिती घेऊन अज्ञात व्यक्तीने एका वयोवृद्ध सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यातून सव्वादोन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही फुटेजवरून पैसे काढणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. ६० वर्षांचे वयोवृद्ध घोडपदेव परिसरात राहत असून, सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. १३ ऑक्टोंबरला ते काळाचौकी येथील एका एटीएम सेंटरमध्ये दहा हजार रुपये काढण्यासाठी गेले होते; मात्र एटीएममधून पैसे आले नाही. सर्व्हर डाऊन झाले असावे, अशी समजूत करुन ते घरी निघून गेले. घरी आल्यानंतर त्यांच्या मोबाईल पैसे डेबीट झाल्याचे काही मॅसेज आले होते. त्यामुळे ते सोमवारी बँकेत गेले होते. यावेळी त्यांना १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांचे डेबीट कार्ड क्लोन करून बँक खात्याची माहिती मिळवून ही फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी भायखळा पोलिसात तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in