घाटकोपर येथे १५वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन संपन्न

संमेलनात चित्रकार आणि साहित्यिक विजयराज बोधनकर यांची मुलाखत घेण्यात आली.
घाटकोपर येथे १५वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन संपन्न
PM

मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ आणि घाटकोपर येथील श्रीमती पी. एन. दोशी विमन्स कॉलेज यांच्या विद्यमाने शनिवार, १६ डिसेंबर रोजी १५वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी अध्यक्षपद भूषवले. सुरुवातीला झालेल्या ग्रंथदिंडीत २२५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या संमेलनात चित्रकार आणि साहित्यिक विजयराज बोधनकर यांची मुलाखत घेण्यात आली. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी उद्घाटकीय भाषणात मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रियांनी सक्षम बनण्यासाठी वाचनाने स्वत:ला समृद्ध करण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in