१६ सशस्त्र गुंडांची उचलबांगडी; 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये आरोपींची धरपकड

मुंबई : मुंबई पोलिसांनी दोन दिवस राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये १२ फरारी आरोपींना हुकडून काढण्यात आले तर अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे सोळा गुंड पोलिसांच्या हाती लागले. याशिवाय पंधरा ड्रॅग पेडलरांचीही गठडी वळण्यात आली.
१६ सशस्त्र गुंडांची उचलबांगडी; 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये आरोपींची धरपकड
प्रातिनिधिक छायाचित्र - Twitter
Published on

मुंबई : मुंबई पोलिसांनी दोन दिवस राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये १२ फरारी आरोपींना हुकडून काढण्यात आले तर अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे सोळा गुंड पोलिसांच्या हाती लागले. याशिवाय पंधरा ड्रॅग पेडलरांचीही गठडी वळण्यात आली.

शहरात एकाचवेळी ११३ ठिकाणी नाकाबंदीसह अनेक गुन्हे प्रतिबंधक उपाय योजून एकूण २०७ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १६ जणांवर कारवाई करण्यात आली. चौदा जुगार आणि इतर अवैध धंद्यावर १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एकूण ४६ आरोपींवर अजामिनपात्र वॉरंटची तसेच २५ आरोपींवर स्टॅडींग वॉरंट बजावण्यात आले. अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एकूण १५ केसेस दाखल करण्यात आल्या. ७० वाहनचालकांवर ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. ६,९०१ वाहनांची तपासणी करून १,८९१ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांनी जुगार अड्डे आणि दारूच्या दुकानांसह २०७ ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

कारवाईत १३ पोलिस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि शहरातील पाच विभागातील कर्मचारी सहभागी होते, शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झाली.

logo
marathi.freepressjournal.in