
मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकापैकी भायखळा स्थानक हे १६९ वर्षें जुने आहे. या स्थानकांत अनेक हेरिटेज वास्तू असून त्याचे योग्यरित्या जतन केल्याने मध्य रेल्वेचा युनेस्को एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार भारतीय रेल्वे आणि देशासाठी अभिमानाचा क्षण.
"आय लव्ह मुंबई" फाउंडेशनच्या शायना चुडासामा मुनोत, मीनल बजाज यांची स्वयंसेवी संस्था "द बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट", संवर्धन आर्किटेक्ट आभा नारायण लांबा इत्यादींनी प्रवाशांच्या हितासाठी सुरू केला होता.
भायखळा रेल्वे स्थानकाला एक फलक आणि प्रमाणपत्रासह युनेस्को एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार प्राप्त झाला.
हा सन्मान शायना चुडासामा मुनोत, मीनल बजाज आणि आभा नारायण लांबा यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.