गाळ्यासाठी हेव्ही डिपॉझिट घेऊन दोघांची सतरा लाखांची फसवणुक ;मायलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मालकीचा एक गाळा तीन वर्षांसाठी हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने घेतला होता.
गाळ्यासाठी हेव्ही डिपॉझिट घेऊन दोघांची सतरा लाखांची फसवणुक ;मायलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई - गाळ्यासाठी हेव्ही डिपॉझिट घेऊन दोघांची सतरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गिता विरण्णा धोत्रे आणि विकास विरण्णा धोत्रे अशी या दोघांची नावे असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. बांधकामाचा व्यवसाय असलेले तक्रारदार गोरेगाव परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी गिता धोत्रे हिच्या मालकीचा एक गाळा तीन वर्षांसाठी हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने घेतला होता. गिता ही कांदिवली परिसरात राहत असून तिच्या मालकीचा वडारपाडा, हनुमाननगर परिसरात एक गाळा आहे.

या गाळ्यासाठी हेव्ही डिपॉझिट घेतल्यानंतर तिने त्यांना चांगला गाळ्यासाठी चांगला ग्राहक मिळवून त्यांना दरमाह भाडे देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी तिच्यावरच हा व्यवहार सोपविला होता. काही दिवसांनी तिने तो गाळा एका बेकरीचालकास भाड्याने दिला होता, मात्र त्यांच्यात वाद झाला आणि तिने त्याला काढून एका चायनिस मालकाला गाळा भाड्याने दिला होता.

या चालकाने त्यांना चार महिन्यांचे वीस हजारप्रमाणे ऐंशी हजार भाडे दिले होते. मात्र नंतर त्याने गिता आणि विकासच्या सांगण्यावरुन त्यांना भाडे देणे बंद केले होते. याच दरम्यान त्यांना या दोघांनी अशाच प्रकारे कृष्णा विश्‍वकर्मा यांच्याकडून याच गाळ्यासाठी दहा लाख रुपयांचे हेव्ही डिपॉझिट घेतल्याचे समजले होते. त्यांनाही गाळ्यावर चांगले भाडे मिळवून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र त्यांना भाडे दिले नाही. अशा प्रकारे तिने या दोघांकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून सतरा लाख रुपये घेऊन महिन्याला मिळणार्‍या भाड्याच्या रक्कमेचा अपहार केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांना ८ लाख ६० हजाराचा एक धनादेश दिला होता.

मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यानंतर या दोघांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गिता आणि विकास या मायलेकांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in