‘गाडी बुला रही है, सिटी बजा रही है’,मध्य रेल्वेचा १७१ वर्षांचा प्रवास; १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली मुंबई-ठाणे पहिली लोकल

एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन, वंदे भारत एक्स्प्रेसपर्यंत, रेल्वेने गेल्या १७१ वर्षांमध्ये आपले जाळे यशस्वीरित्या विस्तृत केले आहे. सध्या मध्य रेल्वे ६ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवते.
‘गाडी बुला रही है, सिटी बजा रही है’,मध्य रेल्वेचा १७१ वर्षांचा प्रवास; १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली मुंबई-ठाणे पहिली लोकल

मुंबई : आशिया खंडातील सर्वात पहिली लोकल १६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणेदरम्यान धावली. त्यानंतर मुंबई लोकलचा प्रवास सुस्साट सुरू झाला आणि काळ बदलला, तसा मुंबईत धावलेल्या भारतातील पहिल्या लोकलचा हळूवार विस्तार होत गेला. सन १९०० मध्ये ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर व अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशाप्रकारे, बॉम्बेद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. मंगळवार, १६ एप्रिल २०२४ रोजी मध्य रेल्वेने १७१ वर्षांत पदार्पण केले. मध्य रेल्वेच्या इतिहासातील एक आनंदमयी क्षण आहे.

एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन, वंदे भारत एक्स्प्रेसपर्यंत, रेल्वेने गेल्या १७१ वर्षांमध्ये आपले जाळे यशस्वीरित्या विस्तृत केले आहे. सध्या मध्य रेल्वे ६ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालना, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदूर वंदे भारत यांचा समावेश आहे.

५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रिकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२७५ मार्ग किमी पेक्षा जास्त अंतरावर पसरली असून या राज्यातील तब्बल ४६६ स्थानकांद्वारे मध्य रेल्वे सेवा देते.

३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बरदरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवेच्या धावण्याने रेल्वे आणि मुंबईच्या उपनगरीय सेवांच्या विद्युतीकरणाची पायाभरणी केली गेली.

नेरळ-माथेरान ११७ वर्षांचा इतिहास

नेरळ-माथेरान लहान रेल्वेनेही ११७ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाइन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारी म्हणून, पावसाळ्यात ही लाईन बंद राहिली, तथापि, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही चालवण्यासाठी २९ सप्टेंबर २०१२ पासून सुरू करण्यात आली. नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास तसेच सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in