धारावी, वांद्र्यात १८ तास पाणीब्लॉक; माहीम परिसरात २५ टक्के पाणीकपात धारावीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम होणार

मुंबई व परिसरात उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले असतानाच मुंबईत पाणी समस्येला मुंबईकरांना सामारे जावे लागते आहे. अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे धारावी-माहीम व वांद्रे परिसरातील काही भागात पाणीपुरवठ्यावर १८ व १९ एप्रिल रोजी परिणाम होणार आहे
धारावी, वांद्र्यात १८ तास पाणीब्लॉक; माहीम परिसरात २५ टक्के पाणीकपात धारावीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम होणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी. उत्तर विभागातील धारावीतील नवरंग कंपाऊंड येथील २४०० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणाची प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार, १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवार, १९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत वांद्रे व धारावी, माहीम येथील काही भागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबई व परिसरात उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले असतानाच मुंबईत पाणी समस्येला मुंबईकरांना सामारे जावे लागते आहे. अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे धारावी-माहीम व वांद्रे परिसरातील काही भागात पाणीपुरवठ्यावर १८ व १९ एप्रिल रोजी परिणाम होणार आहे. या कालावधीत येथील काही भागात १०० टक्के व काही भागात २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. दरम्यान, या कालावधीत पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले.

या भागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद असेल

  • एच पूर्व विभाग : वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (१८ एप्रिल व शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल पर्यंत)

  • जी उत्तर : धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (१८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

  • जी उत्तर : धारावी लूप मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (गुरुवार, १८ एप्रिल रोजी धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा)२५ टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग

  • जी उत्तर : ६० फुटी मार्ग, शीव-माहीम जोडरस्ता, ९० फुटी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (गुरुवार, १८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in