११ महिन्यांत १८,२२९ दशलक्ष टन भंगार विक्री 'झीरो स्क्रॅप मिशन' ; २४८.०७ कोटी मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा

या मोहीमे अंतर्गत नोव्हेंबर गेल्या ११ महिन्यात रेल्वे रुळ, वयोमर्यादा संपुष्टात आलेली अपघातग्रस्त इंजिन, रेल्वे डबे आदी १८,२२९ टन भंगार विक्री करण्यात आली आहे.
११ महिन्यांत १८,२२९ दशलक्ष टन भंगार विक्री
'झीरो स्क्रॅप मिशन' ; २४८.०७ कोटी मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा
PM

मुंबई : भंगारमुक्त परिसरासाठी मध्य रेल्वेने 'झीरो स्क्रॅप मिशन' मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गत नोव्हेंबर गेल्या ११ महिन्यात रेल्वे रुळ, वयोमर्यादा संपुष्टात आलेली अपघातग्रस्त इंजिन, रेल्वे डबे आदी १८,२२९ टन भंगार विक्री करण्यात आली आहे. यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल २४८.०७ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, "शून्य भंगार" उपक्रमास गती मिळाली - विशिष्ट विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीत नोव्हेंबर-२०२३ पर्यंतच्या कालावधीत,  तब्बल ३४.०९ टक्के वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रुळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स, रेल्वे डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.  त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रुपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हे "शून्य-भंगार" उपक्रमाचा भाग आहे. मध्य रेल्वेने ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत तब्बल २४८.०७ कोटी उत्पन्न भंगार विक्रीतून मिळवले. 

'या' भागात भंगाराची विक्री

भुसावळ विभागातून ७,९९४ दशलक्ष टन

मुंबई विभागातून ४,१४४ दशलक्ष टन

नागपूर विभागातून ३,७४८ दशलक्ष टन

सोलापूर विभागातून १,२८० दशलक्ष टन

पुणे विभागातून १,०६३ दशलक्ष टन

विभागीय स्तरावर मिळालेला महसूल

भुसावळ विभागाने ४९.२० कोटी भंगार

माटुंगा आगार ४०.५८ कोटी

मुंबई विभागाने ३६.३९ कोटी

भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेडने २३.६७ कोटीच

नागपूर विभाग २२.३२ कोटी

पुणे विभाग - २२.३१ कोटी

सोलापूर विभाग - २०.७० कोटी

परळ, हाजी बंदर-शिवडी, मनमाड व करी रोड यांनी एकत्रितपणे ३२.९० कोटी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in